Top News महाराष्ट्र मुंबई

“गेल्या पाच वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं?”

मुंबई | ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार, असं म्हणत राज्य सरकारला इशारा देणाऱ्या विरोधी नेते देवेंद्र फडणवीसांन काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं आहे.

गेल्या पाच वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं. मी ओपन चर्चा करायला तयार आहे.  शिवाजी पार्कवर ओपन चर्चा होऊनच जाऊद्या, असं खुल आव्हान वडेट्टीवारांनी फडणवीसांना दिलं आहे.

भाजप सरकारने जाता जाता केवळ 60 कोटी रुपये ओबीसींना दिले तर  मराठा समाजाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पाचशे कोटी रुपये देण्यात आले. त्यामुळे भाजप कोणत्या ओबीसी प्रेमाच्या गप्पा मारत आहे?, असं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, ओबीसी समाज भाजपपासून दूर जात असल्याने फडणवीसांची भाषा बदलली असल्याची टीका वडेट्टीवारांनी केली. त्यामुळे शिवाजी पार्कवरील खुल्या चर्चेच्या आव्हानाला फडणवील काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“रंगबिरंगी नक्षीकामवाल्या कापड्यांच्या पोशाखास मनाई केल्यास मला कसे मंत्रालयात येता येईल?”

संतांनी भारताला जोडलं, राजकारण्यांनी तोडलं- भगतसिंह कोश्यारी

‘ओबीसी आरक्षणाला हात लावाल तर खबरदार’; फडणवीसांनी दिलेल्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री म्हणाले….

चांगली बातमी! राज्यातील ‘हा’ तालुका झाला कोरोनामुक्त

“महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या