बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राज ठाकरेंना कोरोना झाला तर…’; ठाकरे सरकारमधील बड्या मंत्र्याची राज यांच्यावर टीका

मुंबई | मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने स्वाक्षरी मोहिमेचा कार्यक्रम शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही हजेरी लावली होती. मात्र त्यांनी तोंडावर मास्क लावलेला नव्हता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी तोंडाला मास्क लावावा ही आमची विनंती आहे. पण त्यांनी मास्क घातला नाही आणि त्यांना कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार राहणार नाही, अशी उपरोधिक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या कार्यक्रमानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.

एका पत्रकाराने त्यांना तुम्ही मास्क का घातला नाही, असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी अनोख्या अंदाजात उत्तर दिलं.  मी मास्क घालतच नाही, मी तुम्हालाही सांगतो, असं राज ठाकरे म्हणाले. त्यासोबत यावेळी त्यांनी कार्यक्रमाच्या परवानगीबाबत झालेल्या वादावरून सरकारवर टीका केली.

दरम्यान, सरकारच्या कार्यक्रमाला गर्दी होते. सरकारमधील मंत्री सगळ्या कार्यक्रमांमध्ये गर्दीने येऊ शकतात आणि शिवजयंतीला, मराठी भाषा दिनाला नकार देता. करोना संकट समोर येतंय असं वाटत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.

थोडक्यात बातम्या-

‘द चॅनेल 1’नं मारली बाजी; मराठी भाषेतलं पहिलं ओटीटी व्यासपीठ सुरु

प्रशासनातील जुन्या जाणत्या अधिकाऱ्याकडे राज्याच्या मुख्य सचिवपदाची जबाबदारी

‘भारत आणि इंग्लंड आता पुण्यात भिडणार पण…’; बीसीसीआयचा मोठा निर्णय

‘महिलांनो सावध रहा ठाकरे सरकार आहे’; निलेश राणेंचा घणाघात

सावधान! …म्हणत ‘ते’ मुलींच्या काही प्रायव्हेट पार्टला लावायचे हात, मुंबई सायबर सेलची मोठी कारवाई!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More