Top News बुलडाणा महाराष्ट्र

‘पक्षाचा एक आमदार असलेल्या राज ठाकरेंनी…’; विजय वडेट्टीवारांचा ठाकरेंवर पलटवार

बुलडाणा | वीजबिलावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली होती. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला काँग्रेस नेते आणि  मदत आणि पुनर्वसन मंत्री  विजय वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पक्षाचा एक आमदार असलेल्या राज ठाकरेंनी केंद्र सरकारच्या विरोधातही आंदोलन करावं, असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. त्यासोबतच सर्वसामान्यांना जो त्रास पेट्रोल-डिझेल खाण्याचे तेल आणि गॅस वाढीमुळे झाला आहे त्यावरही त्यांनी आपली भूमिका मांडावी, असं वडेट्टीवार म्हणाले.

राज ठाकरेंनी वीडबिलाबाबत टीका करताना त्यांनी  केंद्राच्या विरोधातही आपली भूमिका मांडावी, अशी उपरोधिक टीका विजय वडेट्टीवारांनी केली.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधी वीज बील कमी करू असं सांगितंल मात्र जेव्हा अदानी यांनी राष्ट्रवादचे अध्यक्ष शरद पवार यांची घरी जाऊन भेट घेतल्यावर सरकारने आपली भूमिका बदलत आम्ही वीजबिल माफ करणार नसल्याचं सांगितंल, असं म्हणत ठाकरेंनी पवार आणि राज्य सरकारला निशाणा साधला. यालाच वडेट्टीवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दाबण्याचा काम करत आहेत- जयंत पाटील

‘…तर आम्ही मंत्रालयात घुसून अशोक चव्हाणांसह मंत्र्याचे कपडे काढणार’; छावा संघटना आक्रम

भारताच्या चहाची बदनामी करण्यासाठी परदेशातून षडयंत्र रचलं जातंय- नरेंद्र मोदी

“बाळासाहेब ठाकरेंचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत आली”

शेतकरी आंदोलनावर मिया खलीफाचं पुन्हा ट्विट, म्हणाली…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या