मुंबई | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झालेला दिसतोय, मात्र दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार याच मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्ये करताना दिसत आहेत, त्याच सरकारमधील आमदार रोहित पवार ओबीसींमध्ये अपप्रचार करणाऱ्याला शोधलं पाहिजे, असं वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांचा अंगुलीनिर्देश नेमका कुणाकडे आहे?, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी रविवारी जालन्यामध्ये महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थित विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यांमुळे आता वाद निर्माण झाला आहे.
कुणाला काय द्यायचे ते द्या पण आमच्या हक्काचे आम्ही सोडविणार नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. मी पक्ष, धर्म, जातपात सोडून मी फक्त ओबीसी म्हणून लढत आहे. जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा. ही प्रेरणा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून मिळाली. ते आज हयात नाहीत. त्यांनी केलेल्या संघषार्ला सलाम केलं पाहिजे. मंत्री छगन भुजबळ यांनीही धुरा हाती घेतली ते ही लढत राहिले, हे ओबीसींच्या हक्कासाठी लढणारे नेते आहेत. भविष्यात कशाचीही पर्वा न करता संघर्ष करणार आहे, असं ते म्हणाले.
दुसरीकडे, मराठा आरक्षणाची मागणी करताना दुसऱ्या समाजाच्या आरक्षणातून आम्हाला हक्क पाहिजे, असं कोणीही बोलत नाही. मात्र काहीजण ओबीसींमध्ये अपप्रचार करून समाजात तेढ निर्माण करत आहेत. अशा लोकांना शोधले पाहिजे, असं मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जळगावमध्ये व्यक्त केलं. मात्र, त्यांना आपल्याच आघाडीतील मंत्र्याची भडकाऊ वक्तव्ये दिसत नाहीत का? असा सवाल केला जात आहे.
थोडक्यात बातम्या-
शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट- रामदास आठवले
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धिंगाणा; रोहित पवारांनी अर्ध्यावर सोडला कार्यक्रम
‘कोरोनाच्या नियमांचं पालन होत नाही जर कोरोना वाढला तर…’; शरद पवारांनी व्यक्त केली ‘ही’ भीती
मास्क है जरुरी!; आदित्य ठाकरेंनी ‘मास्क’ म्हणताच सेना आमदाराची उडाली त्रेधातिरपीट!
‘तुमच्या शक्तीचा उपयोग करुन मुलाचं मन वळवा’; शेतकऱ्याचं मोदींच्या आईला पत्र