Top News जालना महाराष्ट्र

“मंत्रिपद गेलं तरी चालेल, ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू”

जालना | मराठा आरक्षणावरूवन राज्यात वातावरण पेटलं आहे. मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. अशातच मंत्रिपद गेलं तरी चालेल पण ओबीसी आरक्षणाला कोण हात लावतो ते पाहू, असं मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. जालनामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.

मराठा आरक्षणामुळे ओबीसी समजाला धक्का लागेल अशी भीती काही ओबीसी नेत्यांना वाटते. आम्ही मराठा समाजासाठी पुर्ण ताकदीने उभे राहू. मात्र आम्हाला ओबीसी समाजामधून आरक्षण द्या म्हणणे पूर्ण चुकीचं असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले.

जर असाच काही प्रयत्न झाला तर मंत्रिपद गेलं तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं.

दरम्यान, वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये आयोजीत ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करण्यात आली. तेव्हा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर वडेट्टीवारांनी मध्यस्थी करत माईक घेत सर्वांना शांत केलं आणि मार्गदर्शन केलं.

 

महत्वाच्या बातम्या-

नो मराठी… नो ॲमेझॉन; ॲमेझॉनविरोधात मनसेची नवी मोहीम

“खोटे संदर्भ देऊन कंगणा सतत विष ओकते, तिला रोखलंच पाहिजे”

“पाटील शब्दाचे पक्के आहेत त्यांनी आता हिमालयात जायला हवं”

धक्कादायक! पुण्यात सासऱ्यानेच दिली सुनेची सुपारी पण झालं असं की…

दिल्लीला धडक देण्यासाठी निघाले बच्चू कडू; रस्त्यात दिसलं ‘हे’ भावस्पर्शी चित्र

कृषी बिल शेतकऱ्यांच्या फायद्याचंच, त्यांनी आंदोलन थांबवावं- रक्षा खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या