“राज ठाकरे इव्हेंट सेलिब्रिटी, एका इव्हेंटचे किती पैसे घेतात?”

Vijay Wadditwar | मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. पाडवा मेळाव्यात त्यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दर्शविला होता. त्यानुसार ते महायुतीसाठी प्रचार करत आहेत. मात्र, राज ठाकरेंची ही बदललेली भूमिका विरोधकांना रुचत नाहीये. त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून जोरदार टीका केली जातेय.

अशात कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत टोलेबाजी केली आहे. त्यांनी राज ठाकरेंच्या सभांवर देखील मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. ते आज 15 मे रोजी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार यांचा राज ठाकरेंवर प्रहार

‘राज ठाकरे एका इव्हेंटसाठी किती पैसे घेतात, याची माहिती समोर आणली पाहिजे.राज ठाकरेंचा पिक्चर आणि सिरीयल आता चालत नाही. त्यामुळे ते इतरांच्या व्यासपीठावर जाऊन काम करतात.’, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांना वरुन ऑर्डर देण्यात आली असेल, ‘बेटा राज देख लो! ये फाईल देख लो’. या फाईल्सचा धसका घेऊनच राज ठाकरे महायुतीच्या मंचावर प्रचारासाठी जात असतील, अशी बोचरी टीका विजय वडेट्टीवार (Vijay Wadditwar )यांनी केली आहे.

मविआला राज्यात ‘इतक्या’ जागा मिळणार

मुंबईतील सभेसाठी भाजपने त्यांना मोठी बिदागी दिली असेल. आम्हीसुद्धा असे सेलिब्रिटी आणतो. त्यांचे विमानाचे तिकीट काढतो आणि पैसे देतो. पण भूमिका बदलणाऱ्याला जनता कधीही साथ देत नाही, असा टोला यावेळी वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंना लगावला.

यावेळी त्यांनी लोकसभेच्या निकालाबाबतही मोठं भाष्य केलं. महाविकास आघाडी महाराष्ट्रात 35 जागा जिंकेल. त्यामुळे मोदी आणि भाजप घाबरलेले दिसत आहेत.जिल्हा परिषदेला सुद्धा नेता एवढ्या सभा घेत नाही, तेवढ्या सभा या राज्यात मोदी घेत आहेत. यामधून त्यांची भीती दिसून येत असल्याचं वडेट्टीवार (Vijay Wadditwar )यांनी म्हटलंय.

News Title-  Vijay Wadditwar on Raj Thackeray

महत्त्वाच्या बातम्या –

“पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हे आरोप खोटे”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

‘या’ नंबरपासून येणारे कॉल उचलू नका; अन्यथा खाली होईल बँक अकाऊंट

घटस्फोटानंतर ईशा देओलची पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात; म्हणाली..

शेतकऱ्यांसोबत पावसाची थट्टा; ‘या’ भागांना अवकाळीचा फटका बसणार

ग्राहकांसाठी आनंदवार्ता! सोन्याचे भाव घसरले; जाणून घ्या दर