बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर येत्या आठ दिवसांत पुन्हा कडक निर्बंध लावणार’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचा जनतेला इशारा

मुंबई | कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने राज्यभर हैदोस घातला होता. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनारूग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात अनलॉक करण्यात आलं आहे. मात्र काही ठिकाणी पुन्हा संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कडक निर्बंध लावणार असल्याचा इशारा दिला आहे.

राज्यातील अहमदनगर आणि इतर जिल्ह्यांत निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या दुपटीने वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. अशा जिल्ह्यातील परिस्थितीचा दैनंदिन आढावा घेत आहोत. त्यामुळे आणखी आठ दिवस आढावा घेण्यात येईल. त्यानंतर जिथे गरज आहे. फक्त त्याच जिल्ह्यांत कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेऊ, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं आहे.

आरक्षणाचा हा विषय केवळ महाराष्ट्रापुरता नाही तर संपूर्ण देशातील आरक्षणाचा विषय आहे. वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, जातनिहाय जनगणना करायला हवी, असं वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षण वाढवावं लागेल. त्यासाठी केंद्राने घटनादुरुस्ती करावी, असं वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर बोलताना, नाना पटोले यांना मुख्यमंत्रिपदासाठी शुभेच्छा आहेत प्रश्नच नाही, असं वडेट्टीवारांनी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

खतरनाक! तरूणाने घरी बनवला बॉम्ब, निकामी न करता आल्याने गेला पोलिसांत अन्…

धक्कादायक! म्हणूनच मुंबईकरांना वाटते पावसाची भीती?; व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

ब्युटी क्वीनने प्रेमाचं नाटक करत बनवला पॉर्न व्हिडीओ त्यानंतर केलं हे घृणास्पद कृत्य

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीवरून रामदास आठवले यांची भन्नाट कविता

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More