बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कौरव कोण, पांडव कोण हे त्यांनीच ठरवावं’; ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचा पंकजा मुंडेंना टोला

मुंबई | केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. आज मुंबईत पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानी गर्दी केली. त्यावेळी त्यांनी समर्थकांना संबोधित करताना कौरव, पांडवांच्या लढाईचा धागा पकडत पक्षातील अंतर्गत राजकारणावर बोट ठेवलं. यावरून ठाकरे सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवारांवर निशाणा साधला आहे.

पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हा पर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा निरादार करत नाही, असं पंकजा मुंडे आपल्या समर्थकांना धीर देताना म्हणाल्या. यावर वडेट्टीवारांनी आपली प्रतिक्रया दिली आहे.

कौरव कोण, पांडव कोण हे त्यांचं त्यांनीच ठरवावं. त्यांची सेना, त्यांचेच कौरव, त्यांचेच पांडव, अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच, ते त्यांनाच लखलाभ, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, विजय वडेट्टीवारांनी पंकजा मुंडेवर निशाणा साधलाच त्यासोबतच त्यांनी भाडप नेत्यांनासुद्धा टोले हाणले आहेत. वडेट्टीवारांच्या टीकेवर भाजपकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोश होत असतो, पण पंकजा मुंडे असे काही करणार नाहीत”

शेतकरी आंदोलनाच्या तोडग्यासाठी पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी संघटनांचं मोठं पाऊल

‘माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा’; पंकजा मुंडेंचा फडणवीसांवर निशाणा???

“माझी जन्मभूमी मुंबई सुरक्षित हातात आहे याचा मला आनंद आहे”

मंत्रालयात खळबळ! एकनाथ खडसेंना क्लीन चीट देणारा ‘तो’ अहवाल गायब

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More