नागपूर महाराष्ट्र

“दानवे येऊन जाऊन बाप काढतात, दानवेंना विचारा त्यांचे बाप कोण आहे, कोणाचे बाप, किती बाप?”

नागपूर | रावसाहेब दानवे येऊन जाऊन बाप काढतात, दानवे यांना विचारा त्यांचे बाप कोण आहे, कोणाचे बाप, किती बाप?, असा सवाल राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

दानवेंना कोणाचाही बाप काढायचा अधिकार नाही, असं प्रत्युत्तर वडेट्टीवार यांनी दिलं आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

केंद्राचा निधी म्हणजे त्यांच्या बापाचे पैसे आहेत का?, त्यांच्या बापाने कमवून ठेवले का?, असं म्हणत वडेट्टीवार यांनी दानवेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

बिहारमध्ये गेल्या वेळी दुसऱ्याची बायको पळवून आणली होती. राज्यातही सकाळी सकाळी गुपचूप लग्न केलं होतं, मात्र, संसार टिकला नाही, अक्षदा पडायच्या आधीच नवरी पळाली, अशा शब्दात वडेट्टीवारांनी दानवे आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 सोमय्यांना आरोप करण्याचे अधिकार, शिवसेनेनं ते खोडावेत- चंद्रकांत पाटील 

राजकीय संन्यास घेण्याचं बोललोच नाही- नितीश कुमार

“सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम, शॉक दिल्याशिवाय बेताल बडबड थांबणार नाही” 

 सोमय्या शिखंडी, केवळ साडी नेसवणं बाकी; किशोरी पेडणेकरांची बोचरी टीका

“उद्धव ठाकरेंनी शपथविधीनंतर 345 कोटी बिल्डरला गिफ्ट दिले”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या