बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पूरग्रस्तांसाठी विजय वडेट्टीवार यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

मुंबई | राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीने 10 हजार रूपयांची मदत करण्याचा निर्णय आहे. तसेच दरडग्रस्तांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिलीये.

दरडग्रस्तांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींचा संपूर्ण उपचार आणि त्यासाठी लागणारा खर्च सरकार करेल. तसेच ज्या नागरिकांच्या घरांना पुराचा फटका बसला आहे अशा कुटुंबांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. पात्र लोकांची यादी महिन्याभरात तयार होईल. जे बाधित आहेत त्यांना जमीन दिली जाईल. त्यांचं एका वर्षाच्या आत पुनर्वसनाचं काम केलं जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पूरग्रस्त चिपळूणची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी तातडीने मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी मदितीची घोषणा केली आहे.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे राज्यातील आठ पेक्षा जास्त ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर आल्या. यापैकी रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील तळई गावाचं प्रचंड नुकसान झालं. या दुर्घटनेत आतापर्यंत 43 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील आंबेघर गावात 15 तर मिरगावात 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

सांगलीत कृष्णेचा रूद्रावतार ; 1 लाख 96 हजार 957 नागरिकांचं स्थलांतर

काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन!

PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे येणार

भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाज फेल; टी-20 सामन्यात भारताचा दमदार विजय

“आता प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More