“भुजबळांची भाजपसोबत जाण्याची इच्छाच नव्हती, पण..”; ‘या’ नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

Vijay Wadettiwar | राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. भुजबळ यांना लोकसभेची निवडणूक लढवायची होती. पण, महायुतीमधील वादामुळे त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही.

त्यातच राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील भुजबळ यांनी आपली इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. मात्र, या जागेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली.त्यामुळे सध्या भुजबळ नाराज असल्याचं म्हटलं जातंय.

छगन भुजबळ यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये देखील अनेक गौप्यस्फोट केले. याच्या दुसऱ्याच दिवशी आता नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कॉँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी छगन भुजबळ यांच्या बद्दल धक्कादायक दावा केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

“वरिष्ठ असूनही छगन भुजबळ यांना पक्षात डावलण्यात आलं. त्यांच्या पक्षात ज्यांना जे मिळेल ते ते ओरबडून खाल्ले जात आहे. हे सरकार आता कमिशन खोर झालंय. त्यांनी खरेदीचा सपाटा लावलाय. भुजबळ यांची अजित पवारांसोबत जाण्याची इच्छा नव्हती. त्यांनी मला हे खासगीत सांगितलं होतं.”, असा गौप्यस्फोट वडेट्टीवार यांनी केला आहे.

तसंच पुढे ते म्हणाले की, “यांना केवळ सत्ता, संपत्ती याचा लोभ लागला आहे. गरज नसताना यांनी खरेदीचा सपाटा लावला आहे. त्यात भुजबळ यांची भाजपसोबत जाण्याची त्यांची इच्छाच नव्हती. आज त्यांच्यावर अन्याय होत असेल तर भुजबळ वाघ होते. त्यांच्या भुजामध्ये बळ आहे, त्यांनी ते दाखवून द्यावं. तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो, असे करण्यात काहीच अर्थ नाही. आता एक तुकडा दोन घाव त्यांनी करावे. परंतु आता कुरकुर करतात. ही अपेक्षा त्यांच्याकडून नाही.”,असं म्हणत वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) यांनी टोला देखील लगावला आहे.

“आता कुरकुर करत बसण्यापेक्षा..”

तसंच पुढे वडेट्टीवार यांनी मोठा दावा देखील केला. “भुजबळ हे शेवटच्या टप्प्यात गेले. त्यांची इच्छा नव्हती. पण, तपास संस्थांचा दबाव आणून अनेकांना नेण्यात आले. आता भुजबळांनी तेथेच राहावे. अजित पवार यांनी तेथेच भाजपसोबत राहावे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांच्याकडून सत्ता काढून आम्हाला देईल.”, असं वडेट्टीवार ( Vijay Wadettiwar ) म्हणाले.

News Title :  Vijay Wadettiwar big claim about Chhagan Bhujbal

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदवार्ता! सोने-चांदीचा ग्राहकांना मोठा दिलासा, ‘इतक्या’ घरसल्या किंमती

शेतकऱ्यांनो PM Kisan चा 17 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार!

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम; 95 रुपयांची बचत बनवेल लखपती!

तरुणांनो सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! PGCIL विभागाअंतर्गत भरती सुरु

महिलांनो सावधान! या कारणांमुळे पुरुषांपेक्षा महिलांना हृदयविकाराचा धोका अधिक