भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Vijay Wadettiwar Big claim about Dhananjay Munde

Vijay Wadettiwar | बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Case) सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे. सध्या कराड हा तुरुंगात असून त्याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विरोधी गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, सध्या वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही आता जोर धरू लागली आहे. (Vijay Wadettiwar )

या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आज (2 जानेवारी) कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला. माध्यम प्रतिनिधींनी त्यांना अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाराजीबाबत विचारले. यावर बोलताना वडेट्टीवार यांनी सूचक विधान केलं.

अजितदादा शांत म्हणजे, कुछ तो गडबड है…

त्यांच्याकडे नाराजी व्यक्त करून पर्याय काय? एक तर भाजपकडे जा नाहीतर घरी बसा. ओबीसी नेत्याचा महाराष्ट्रात सरकारने दुरुपयोग केलाय. त्यांना सत्तेच्या बाहेर ठेवलंय.भुजबळ यांना भोपळा दिला. ओबीसीला गृहीत धरून ओबीसीच्या भावनांशी खेळणारं हे सरकार आहे. त्यामुळे भुजबळ यांच्याकडे आता फार पर्याय नाहीत, असं वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) म्हणाले.

तसंच पुढे बोलताना त्यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांनाही टार्गेट केलं. “धनंजय मुंडेंची विकेट पाडून भुजबळांचा समावेश करण्याचा विचार अजितदादांच्या मनात आहे का?, अजितदादा या प्रकरणात अजिबात बोलत नाहीयेत. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असताना अजितदादा शांत बसले. यात कुछ तो गडबड है…”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

“मोठ्या आकाला वाचवण्यासाठी…”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्या भेटीत नक्कीच काही तरी झालं असेल. भुजबळ यांना देशाचा ओबीसीचा नेता भाजप करेल, तो पर्याय भुजबळांना खुला राहील, असंही पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलंय. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात देखील अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी वाल्मिक कराडबाबतही मोठा दावा केला.मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा (वाल्मिक कराड) एन्काऊंटरही होऊ शकतो, एका जवळच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने मला हे सांगितलं असल्याचं वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी म्हटलं आहे.

News Title :  Vijay Wadettiwar Big claim about Dhananjay Munde

महत्त्वाच्या बातम्या-

छगन भुजबळ भाजपमध्ये कधी प्रवेश करणार? महत्वाची माहिती समोर

सरपंच हत्ये प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले देशाबाहेर फरार?, मोठी अपडेट समोर

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खुलासा होणार?, SIT मध्ये ‘या’ मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश

बीड पोलीस ठाण्यात आणले 5 पलंग, रोहित पवारांनी कराड कनेक्शन असल्याचा केला आरोप!

‘हळूहळू टीव्ही, एसी असं सगळंच…’; वाल्मिक कराडला तुरुंगात मिळतेय VIP ट्रीटमेंट?

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .