Top News

शेतकऱ्यांसाठी मोर्चा ही शिवसेनेची फक्त नौटंकी- विजय वडेट्टीवार

मुंबई | राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री गप्प बसतात आणि बाहेर येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन मोर्चा काढण्याची भाषा करतात. हा प्रकार म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची नौटंकी आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्याच्या सत्तेस सहभागी असतानाही शिवसेनेला शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावता आले नाहीत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेवर केला आहे.

शिवसेनेचा पीक विमा कंपन्याच्या विरोधातील मोर्चा म्हणजे पुतणा मावशीचे प्रेम आहे, असा टोलाही वडेट्टीवारांनी शिवसेनेला लगावला आहे.

शिवसेनेला जर शेतकऱ्यांचा कळवळा असता तर पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना नाडवत असताना सरकारी पातळीवरुनच त्यांचा बंदोबस्त केला असता. पण ते शक्य नाही म्हणूनच ते मोर्चाचा स्टंट करीत आहेत, असा वडेट्टीवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-असले चिछोरे चाळे करणे बंद करा; पंकजा मुंडे यांचा धनंजय यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा

-फायनल सामन्यअगोदर न्यूझीलंडने भारतीय क्रिकेटप्रेमींना केलं ‘हे’ आवाहन!

-पुणे विद्यापीठातला धक्कादायक प्रकार; विद्यार्थ्यांमध्ये संताप

-शिवसेनेच्या दोन नगरसेवकांमध्ये वाद; एकाने लगावली दुसऱ्याच्या कानशिलात

-उद्धव ठाकरेंचं पीक विमा आंदोलन होऊच देणार नाही- सुभाष देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या