महाराष्ट्र मुंबई

पूजा चव्हाण प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचं अजब वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | परळीची असलेल्या पूजा चव्हाणनं गेल्या रविवारी मध्यरात्रीनंतर पुण्यात आत्महत्या केली. हे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचा हात असल्याची चर्चा आहे. यानंतर भाजपने हे प्रकरण लावून धरलं आहे. याप्रकरणी आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तिच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी तक्रार करायला हवी. त्यानंतर तिचं शोषण झालं की नाही? नेमकं काय झालं? हा काय प्रकार आहे? एकूण घटनेचं गांभीर्य काय आहे? याचा तपास पोलिस करू शकतात. तसेच ज्या घरातील व्यक्ती किंवा कुटुंबाीतील व्यक्ती आत्महत्या करते. त्या घरातील व्यक्तीला चिंता असते. इतरांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले.

स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी एखाद्याची प्रतिमा खराब करण्यासाठी एखादी राजकीय भूमिका घेऊन वक्तव्य करणं योग्य नाही, असं म्हणतं त्यांनी भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, पूजा चव्हाणचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याचं दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

IPS कृष्णप्रकाश अ‌ॅक्शन मोडमध्ये, अवैध धंदे करणारांची आता खैर नाही!

आता ट्रॅक्टरही सीएनजीवर, वर्षाला एक लाख रूपये वाचणार!

कोण होती पूजा चव्हाण? का होतेय तिच्या आत्महत्येची एवढी चर्चा???

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण; ही धक्कादायक माहिती आली समोर

कशी नशिबानं थट्टा आज मांडली!; ‘शून्य…’ विराट कोहलीचा विश्वासच बसला नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या