Top News चंद्रपूर महाराष्ट्र

‘भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला माहित’; विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट

Photo Credit- Facebook/ Devendra Fadnavis & Vijay Wadettiwar

चंद्रपूर | मूळची परळीची असलेल्या पूजा चव्हाणने पुण्यातील महंमदवाडी परिसरातील इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्ये प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मातोश्रीवर दिल्याची चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा गंभीर आरोप केला होता, त्यानंतर आता शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव तरूणीच्या आत्महत्येशी जोडलं गेलं. दोन्ही प्रकरणात भाजपनं सरकारवर टीकास्त्र सोडलंय.  याबाबत बोलताना काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांची महिलांबाबत डझनभर प्रकरणं मला सांगता येतील, पण भाजप नेत्यांना नैतिकता लागू पडत नाही, तिथं नैतिकता संपुष्टात येते, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

संजय राठोड हे मिडीया ट्रायलचे बळी पडले आहेत, असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याप्रकरणी स्पष्ट भूमिका घेतली ते योग्य केलं. या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत अद्याप मला काही माहिती नाही, पण संजय राठोड हे प्रकरण सरकारशी संबंधित आहे. सरकारमधील मुख्य लोकं या प्रकरणा संबधित निर्णय घेतील, संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार, मंत्री आहेत, अनेक वर्षापासून ते शिवसेनेचा चेहरा आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत, शिवसेनेत दोन गट वैगेरे काही नाही, असं स्पष्टीकरण शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईतील नायर रुग्णालयात 26 वर्षीय डॉक्टरच्या आत्महत्येनं खळबळ!

विराट कोहलीला मोठा धक्का; होऊ शकते ‘ही’ मोठी कारवाई

गुंडांना टोलमाफी, फटाके वाजवून जल्लोष… गृहराज्यमंत्री अ‌ॅक्शन मोडमध्ये!

पूजा चव्हाण प्रकरणात ऑडिओ क्लीप कशा लीक झाल्या?; समोर आली धक्कादायक माहिती

सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतली ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची भेट; चर्चांना उधाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या