मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांना कोरोनाची लागण होत आहे. त्यातच आता आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे.
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. वडेट्टीवार हे सध्या मुंबईत विधिमंडळ अधिवेशनात सहभागी झाले आहेत. कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनला गेल्या 1 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. त्यामुळे आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करावी, असं आवाहन करण्यात येत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सर्व आमदार तसेच विधानभवन परिसरातील सर्व कर्मचारी, पोलिस, पत्रकार यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. एकूण 3200 जणांची कोव्हिड-19 ची टेस्ट करण्यात आली होती. यात 25 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
थोडक्यात बातम्या-
‘या’ जिल्ह्यातील चार टोळींमधील 18 गुंडांना केलं तडीपार
प्रत्येक मृत्यूमागे एक रहस्य, सगळ्या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी होईल ना? – चित्रा वाघ
राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक
मनसुख हिरेनचं नक्की काय झालं? संपूर्ण घटनाक्रम; वाचा सविस्तर…
बाबो! रिषभ पंतने जेम्स अँडरसनला मारलेला रिव्हर्स स्वीप पाहिलात का, पाहा व्हिडीओ
Comments are closed.