पुणे अपघात प्रकरणाला नवं वळण; ‘या’ नेत्याचा गंभीर आरोप

Pune News | पुण्यातील अपघाताला आता अनेक वळणं प्राप्त होताना दिसत आहेत. या प्रकरणाला आता राजकीय रंग प्राप्त झाला आहे. यासाठी आता काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ट्विट करून हल्लाबोल केला आहे.

पुणे शहरातील (Pune News) कल्याणीनगर येथे पोर्शे गाडीच्या अल्पवयीन चालकाने दोन इंजिनियर युवक आणि युवतीला भररस्त्यात उडवले. पार्टीवरून इंजिनियर युवक आणि युवती पार्टीवरून घरी येत असताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अशातच आता याप्रकरणी आरोपी वेदांत अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल हे पुण्यातील मोठे व्यवसायिक असल्याचं समजतंय. त्यांना संभाजीनगरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Vijay Wadettiwar)

अशातच आता याप्रकरणाला राजकीय वळण मिळालं आहे. काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी ट्विटच्या माध्यमातून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. आरोपी अल्पवयीन असुनही त्याच्या हातात गाडी देणं, रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्याच्या रस्त्यावर कशी आली?, नियम डावलून बार आणि पब सुरू होते का?, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

Pune News | विजय वडेट्टीवार यांचं ट्विट

“दोन निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायिक चौकशी व्हावी पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, त्यामुळे या प्रकरणी न्यायिक चौकशी व्हावी पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारूत पित असल्याचे CCTV फुटेज असून ही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. अल्पवयीन आरोपीला दारू कशी उपलब्ध झाली? रजिस्ट्रेशन नसलेली गाडी पुण्यातील रस्त्यावर कशी आली? नियम डावलून बार आणि पब सुरू होते का? होते तर त्यांच्यावर कारवाई का नाही? या प्रश्नांचा तपास न करता आरोपीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जणू पुणे पोलिसांचा तपास असल्याचे चित्र आहे”

“आरोपी अल्पवयीन आहे हे माहीत असताना त्याच्या वडिलांना अटक करण्यात इतका वेळ का लागला? म्हणूनच सदर घटनेची न्यायिक चौकशी व्हावी आणि या प्रकरणात पुणे पोलिसांची सुद्धा चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे”, असं ट्विट विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं आहे.

दरम्यान आरोपी वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याने त्याचे वडील आणि पुण्यातील बांधकाम बिल्डर विशाल अग्रवाल यांना छ्त्रपती संभाजीनगरमधून बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलीस क्राईम ब्रँच आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आरोपींच्या वडिलांना अटक केली आहे.

News Title – Vijay Wadettiwar On Pune Accident Porsche Car

महत्त्वाच्या बातम्या

पोर्शे कारसंदर्भात धक्कादायक माहिती समोर; वडिलांनीच मला…

आली रे आली आता तुझी बारी आली; ‘सिंघम अगेन’मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याची एन्ट्री!

सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी, आजच वाचा नाहीतर विनाकारण अडकाल

आज बारावीचा निकाल लागणार; ‘या’ 4 वेबसाईटवर निकाल पाहा सर्वात आधी

पोर्शे दुर्घटनेप्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, आवळल्या मुसक्या