Vijay Wadettiwar | मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यात आरक्षणावरून कलगीतुरा रंगला आहे. मराठा समाज हा ओबीसीतून आरक्षणाची मागणी करत आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाज आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन आणि उपोषण करताना दिसत आहे. अशातच आता ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे आंदोलन आणि उपोषण करताना दिसत आहेत. याचा आज आठवा दिवस आहे. यावेळी काँग्रेस नेते आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपोषणस्थळी जात मुख्यमंत्र्यांना फोन केला.
ओबीसी समाजाचे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे उपोषण केलं. त्यावेळी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन लावला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यात बातचीत झाली. उद्या मंत्रीमंडळाचं शिक्षणमंडळ पाठवू, असं आश्वासन विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना फोनवरून दिलं.
विजय वडेट्टीवार आणि एकनाथ शिंदेंचा फोनकॉल
विजय वडेट्टीवार – सीएम साहेब मी आता एका उपोषणाच्या स्थळी आलो आहे. आमच्या ओबीसी नेत्याचं उपोषण सुरू आहे. मंत्री अतुल सावेंनी फार काही चर्चा केली नाही. कृपया तुम्ही दोन मंत्र्यांना इथं पाठवा. इथे हजारोंच्या संख्येने फार मोठा जनसमुदाय आहे. तुम्ही त्यांच्या भावना समजावून घ्या.
मुख्यमंत्री – लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी त्यांना म्हणावं काळजी घ्या. ओबीसींचं काहीही नुकसान होणार नाही. त्यांचं कोणतीही डॅमेज होणार नाही. याची खबरदारी घेतली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत आपली जी भूमिका आहे तिच भूमिका आहे ती आजही असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
विजय वडेट्टीवार – माझी विनंती आहे की, दोन मंत्री आणि सरकारचं शिष्टमंडळ उपोषणस्थळी पाठवा, अशी मागणी उपोषणकर्ते आणि ओबीसी समाजाची मागणी आहे. सगेसोयरेंबाबतची जी भूमिका आहे, त्याबाबत तुम्ही आश्वसान द्या. सगेसोयरे आरक्षण कोर्टात टिकणार नसल्याचं तुमचे नेते गिरीश महाजन म्हणाले होते.
मुख्यमंत्री – मी उद्या सरकारचं शिष्टमंडळ उपोषणास्थळी पाठवतो. ते त्यांच्यासोबत चर्चा करतील, असं विजय वडेट्टीवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात संवाद झाल्याचा दिसून आला.
News Title – Vijay Wadettiwar Phone Call To Cm Eknath Shinde
महत्त्वाच्या बातम्या
“40 लाखांचा बाथटब, 12 लाखांचं कमोड..”; आलिशान पॅलेसमुळे आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अडचणीत
सुजय विखेंना पराभव पचेना; घेतला मोठा निर्णय, निलेश लंकेंविरोधात…
‘आम्हाला भिडवत ठेवलं तर… ‘; मनोज जरांगेंचा थेट देवेंद्र फडणवीसांना इशारा
बहुचर्चित ‘मुंज्या’चा थरार आता ओटीटीवर दिसणार; कधी आणि कुठे पाहणार?
“हिंमत असेल तर…”, संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलं चॅलेंज