महाराष्ट्र मुंबई

“भाजपच्या नेत्यांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे”

मुंबई | भाजपकडून वाढीव वीज बिलात सवलत देण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. यावरून  राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचे दर वाढवून सामान्य माणसाचं कंबरडं मोडणाऱ्या भाजपच्या नेत्यांना वीज बिलाच्या विरोधात आंदोलन करताना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

एकीकडं भाजपवाले वीज बिलाच्या विरोधात ओरड करताहेत, दुसरीकडं आजच घरगुती सिलिंडरचे भाव 25 रुपयांनी वाढवले आहेत. हा भाजपचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

घरगुती गॅसचे दर गगनाला भिडलेत. मध्यमवर्गीय माणसाचं कंबरडं मोडलंय. त्यांचं संपूर्ण बजेट भाजप सरकारनं बिघडवून टाकलंय. असं असताना वीज बिलाचं तुणतुणं वाजवणं हा लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

“कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही उगाच कशाला नाव घेऊन त्यांना मोठं करायचं”

‘सचिन तेंडुलकर भाजप सरकारचा दलाल’; संभाजी ब्रिगेड आक्रमक

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

शेतकरी आंदोनावर सलमान खाननं सोडलं मौन; म्हणाला…

पाॅपस्टार रिहानाबद्दल भारतीय लोक इंटरनेटवर शोधत आहेत ‘ही’ धक्कादायक गोष्ट

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या