Vijay Wadettiwar | पावसाळी अधिवेशनात विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक शैलीत शिंदे सरकारवर मुंबईमधील जागांकडे लक्ष वेधताना घणाघाती शाब्दिक हल्लाबोल केला आहे. दुग्ध शाळेची जागा गौतम अदानींना देण्यास विरोध केला होता. त्यामुळे आता तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली असल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं आहे.
अदानीला जागा देण्यासाठी तुकाराम मुंढेंचा विरोध
मुंबईतील मोक्याच्या जागा अदानींना दिल्या जात आहेत. दुग्ध शाळेची जमीन सुद्धा दिली जात आहे. ही जमीन तब्बल 20 हजार कोटींची आहे. याच जागेला विरोध केल्यानेच तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
त्यानंतर पुढे विजय वडेट्टीवार यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, मुंबईसाठी हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. अभिमान वाटावा अशी मुंबई आहे. मात्र मिंधे सरकारने जमिनी अदानींच्या घशात घालण्याचं काम त्यांनी केलं, असा विजय वडेट्टीवार यांचा धक्कादायक दावा आहे.
जमिनीची मूळ किंमत ही 20 कोटी आहे. महाराष्ट्राला फसवलं जात आहे. त्याचा विरोध केल्यानंतर तुकाराम मुंढेंची बदली केली जात असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. मुंबईला वाचवा. राज्याचे प्रमुख त्यांना पाठिशी घालत आहे. याची चौकशी करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय तुम्ही आदेश द्या, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
“मुंबई अदानींकडे गहाण ठेवण्याची भूमिका”
मोक्याच्या जागा त्यांच्या घशात घातल्या जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचं ते म्हणाले आहेत. मुंबई अदानींकडे गहाण ठेवण्याची भूमिका घेतली असून त्याचा आम्ही निषेध करत असल्याचं ते म्हणाले.
News Title – Vijay Wadettiwar Slam To Shinde Government Over Gautam Adani
महत्त्वाच्या बातम्या
“परळीत वाल्मिक कराडांची दहशत, इथं धनुभाऊंचं काहीच चालत नाही”
पावसाबाबत हवामान खात्याचा मोठा अंदाज; ‘या’ भागात येलो अलर्ट जारी
लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “निवडणुकीआधीचा जुमला..”
वसंत मोरे ठाकरेंच्या वाटेवर?, ‘मातोश्री’वर आज घेणार उद्धव ठाकरेंची भेट
ललित पाटील ड्रग्स प्रकरणी मोठी अपडेट समोर!