“शिंदे-फडणवीसांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय, राज्यातले उद्योग गुजरातला पळवले”

Vijay Wadettiwar | लोकसभा निवडणूक पार पडली. पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत राज्याचा विचार केला असता महाविकास आघाडीने बाजी मारली. तर महायुतीला म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. यावर आता महाविकास आघाडीचे नेते सरकारवर हल्लाबोल करत आहेत. अशातच काँग्रेस नेते आणि विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुतीवर टीका केली आहे.

देशासाठी संविधान आणि महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. हाच महाराष्ट्राचा स्वाभिमानगहाण ठेवला असून तो परत आणायचा आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र परत मिळवायचा आहे, म्हणून आगामी निवडणुकीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच मुद्दा असणार आहे.

तसेच राज्य विधीमंडळाचे अधिवेशन गुरूवारपासून सुरू होत आहे. सरकारच्या चहापणाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला असल्याची माहिती आता वडेट्टीवारांनी दिली आहे. महाराष्ट्र कधीही झुकला नाही आणि झुकणारही नाही असं विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले आहेत.

नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

“उद्यापासून अधिवशेनाला सुरूवात होत आहे. आज शाहू महाराजांची जयंती आहे. त्यांना मी अभिवादन करतो. शाहू महाराज हे सामाजिक समतेचे जनक मानले जातात. महायुतीने या राज्याला खड्ड्यात घातलं. त्यांच्या फुगलेल्या छातीतून हवा काढायचं काम हे मतदारांनी केलं आहे. त्यांचं आभार मानतो. दोन वर्षांआधी लोकशाहीचा गळा घोटला. लोकांनी निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.”, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

तसंच, दडपशाहीने राज्य चालवता येत नाही आणि जनता त्यांच्या पाठिशी उभी राहत नाही हा संदेश दिला. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. मात्र ही एक जुमलेबाजी असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांना फसवण्याचं काम हे महायुती सरकारने केलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. सोयाबीनला 1500 रूपये हमी भाव देण्यात यावा अशी मागणी केली मात्र मिळाले काय? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

खते आणि अवजारांवर 30 ते 35 टक्के आणि मजुरीमध्ये वाढ झाली आहे. अंत्यविधीच्या साहित्यावर 18 टक्के टॅक्स लावला गेला आहे. त्यामुळे मरणही महाग झालं आहे. सरकार भंगार आणि एसटी महामंडळाच्या गाड्या देखील भंगार झाल्याचं विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले आहेत.

News Title – Vijay Wadettiwar Slam To State Government

महत्त्वाच्या बातम्या

मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला, मात्र ‘हे’ जिल्हे अजूनही कोरडेच; शेतकऱ्यांची चिंता वाढली

शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधी देखील पायी वारीत सहभागी होणार?

“पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, मग बीडचा विकास का केला नाही?”

“…तर निवडणूक स्वतंत्र लढावी लागेल”; अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य

वयाच्या 50 शीत मलायकाला प्रेमात मिळाला धोका?; अर्जुनच्या वाढदिवशी केली क्रिप्टिक पोस्ट