“30 हजारांमधून फक्त 900 विद्यार्थ्यांना युक्रेनमधून आणलंय, फार मोठा तीर नाही मारला”
नागपूर | रशिया-युक्रेन युद्ध दिवसेंदिवस भयानक रूप घेत आहे. रशियाकडून होत असलेले बॉम्ब हल्ले, गोळीबार आणि मिसाईलचे आवाज यामुळे युक्रेन हादरलं आहे. रशिया-युक्रेन युद्धाची झळ भारतालादेखील बसत आहे. हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याने त्यांना मायदेशी आणण्याचे आतोनात प्रयत्न सध्या सुरू आहेत.
भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारने ऑपरेशन गंगा सुरू केलं आहे. 900 विद्यार्थी मायदेशी परतले असले तरी भारतातील 25 ते 30 हजार विद्यार्थी अजूनही यूक्रेनमध्ये अडकले आहेत. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
युक्रेनमध्ये 30 हजार विद्यार्थी अडकले आहेत. 30 हजारांमधून फक्त 900 मुलांना परत आणलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने फार मोठा तीर मारलेला नाही, अशी खरमरीत टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. तर ऑपरेशन गंगा वाहून जाता कामा नये. प्रत्येक विद्यार्थ्याला परत आणावे, असा टोला देखील वडेट्टीवार यांनी लगावला.
दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीत इतर देशांनी आपले नागरिक मायदेशी नेले, आपण मात्र लवकर पावलं उचलली नाहीत. दोन विमानं आणले म्हणजे सर्व विद्यार्थी आणले असं होत नाही. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागतील, असा सल्ला देखील विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
“वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती वाटतीये अन् चिरंजीवांना दिल्लीची स्वप्न पडतायत”
“राज्यपालांनी शिवप्रेमी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत, त्वरीत वक्तव्य मागे घ्या”
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
मोठी बातमी! संभाजीराजेंची प्रकृती ढासळली, तरीही औषधं घ्यायला नकार
थायरॉईड असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘हे’ ज्यूस ठरतील फायदेशीर
Comments are closed.