‘हळूहळू टीव्ही, एसी असं सगळंच…’; वाल्मिक कराडला तुरुंगात मिळतेय VIP ट्रीटमेंट?

Vijay Wadettiwar tweet In discussion on Walmik Karad

Walmik Karad | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. 31 डिसेंबररोजी पुण्यात तो स्वतः पोलिसांना शरण गेला. यानंतर कराडला कोर्टाने 15 दिवसांची कोठडी सुनावली आहे. सध्या कराडला बीड शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. मात्र, वाल्मिक कराडला (Walmik Karad ) अटक झाल्यानंतर बीड पोलीस ठाण्यात पाच नवीन पलंग आणण्यात आले, असा आरोप करण्यात येत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत गंभीर दावा केलाय. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीट देखील केलंय. बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत, असं ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केलं आहे.

विजय वडेट्टीवार यांचं ट्वीट चर्चेत-

यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या प्रकरणी एक नवीन ट्वीट केलंय. त्यांनी तुरुंगात आरोपीचे लाड पुरवले जात असल्याचं म्हटलंय. महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड (Walmik Karad ) येत असल्याने बीड पोलीस स्थानकात नवीन पाच पलंग आले का?, असा खोचक सवाल कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

वाल्मिक कराड पोलीस कोठडी मध्ये असताना पाच पलांगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटात ही नसतात. आरोपीचे लाड पुवण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टिव्ही, एसी, पंचतारांकित हॉटेल मधील जेवण सगळच मिळेल. वाल्मिक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का? करायची असेल तर बीड जिल्ह्याच्या बाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे, असंही पुढे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar tweet

सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक बंद करावे-

ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा? सरकारने कराड वर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी.कराडवर अजूनही संतोष देशमुख हत्या असो की मकोका अंतर्गत गुन्हा ही दाखल झालेला नाही, त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, असं ट्वीटमध्ये वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

दरम्यान, बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad ) सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र, 3 आरोपी अजूनही फरार आहेत. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी गठित करण्यात आली आहे. यामुळे तपासाला आणखी वेग येणार आहे.

News Title : Vijay Wadettiwar tweet In discussion on Walmik Karad

महत्त्वाच्या बातम्या-

मोठ्या आकाला वाचवण्यासाठी कराडचं एन्काऊंटर होणार?, अत्यंत खळबळजनक दावा समोर

“हैदराबादला अल्लू अर्जुनला अटक होते पण महाराष्ट्रात…”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल

नवीन वर्षात सोनं स्वस्त झालं की महाग?, काय आहेत सध्या ग्रॅमचे दर?

सरकारला कोटींचा चुना लावत GFवर उधळले पैसे; अखेर ‘तो’ आरोपी अटकेत

सरपंच हत्या प्रकरणी फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .