बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वडेट्टीवार हा जातीयवादी माणूस”; विनायक मेटेंना वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

मंबई | शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पून्हा एकदा महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार हा जातीयवादी माणूस आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी, असा आरोप विनायक मेटेंनी केला होता. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी विनायक मेटेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विनायक मेटे यांनी वडेट्टीवार यांच्यावर घणाघात केला होता. मागासवर्ग मंडळ त्या समाजासाठी तसेच भटक्या विमुक्त जातीसाठी काम करत असतात. मेटे यांनी वेगळा चष्मा लावला आहे. ज्यांना कोणताही आधार नाही, त्याला वाटेल ते बरगळत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची काहीच गरज नाही आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

शिवसंग्राम पक्षाकडून राज्यात आंदोलन करण्यात आलं होतं. शिवस्मारकारचे काम अजूनपर्यंत झालं नाही. महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना महाराजांचा विसर पडला आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर 23 तारखेपासून नगरपासून आंदोलनाला सुरूवात करू असा इशाराही मेटेंनी यावेळी ठाकरे सरकारला दिला आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊन शिवसेना सत्तेत आली आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन वर्षात एकदा ही शिवस्मारकासाठी 2 मिनिटंही वेळ दिला नाही, असं मेटे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

भारतातील ‘या’ ठिकाणांवर दहशतवाद्यांचा डोळा, गुप्तचेर यंत्रणेकडून हाय अलर्ट जारी

“सरकारमधील लोक तोंडात पान-गुटखा खाऊन बसलेत का?”

मृत्यूच्या 6 दिवस आधी सिद्धार्थनं केलं होतं मोठं काम, तुम्हालाही अभिमान वाटेल!

मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाच्या टीमची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अफगाणिस्तान क्रिकेट वर्ल्डकप खेळणार की नाही?, तालिबान्यांचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More