कोल्हापूर महाराष्ट्र

पार्थ समजदार, तो झाला प्रकार विसरून जाईन; कोल्हापूरच्या आत्याची प्रतिक्रिया

कोल्हापूर |  राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवार यांना जाहीरपणे फटकारल्यानंतर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. कौटुंबिक पातळीवर देखील याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले आहेत. शरद पवार एवढे रागाने कधीच बोलत नाहीत, असं खुद्द पार्थ यांच्या कोल्हापूरच्या आत्या विजया पाटील म्हणाल्या आहेत. तसंच पार्थ जरी नाराज झाला असला तरी तो समजून घेईन, असं त्या म्हणाल्या.

साहेबांच्या बोलण्याने जरी पार्थ नाराज झाला असेल तरी तो समजून घेईन. आमच्या घरात तो खूपच समजूतदार मुलगा आहे. त्यामुळे साहेबांनी जरी तसं वक्तव्य केलं असलं तरी तो फार मनाला लावून घेणार नाही, असं सांगत शरद पवार यांच्या चिडून बोलण्याचं आश्चर्य वाटल्याचं पाटील म्हणाल्या.

आजोबांना नातवाला रागावण्याच्या पूर्ण अधिकार आहे. सगळ्यांच्याच घरी वडिलधारी माणसं समजावत असतात. मात्र शरद पवारांना असं रागवताना पहिल्यांदाच पाहिल्याचं पाटील यांनी सांगितलं.

पार्थ समजूतदार आहे आणि सध्याची परिस्थिती हाताळण्यासाठी पवार कुटूंब सक्षम आहे. हा इतका विषय वाढवण्याचीच काही गरज नव्हती. पार्थ हा आता सगळे काका आणि आत्या यांच्याशी बोलणार आहे. अजून तरी पार्थचा फोन आला नाही. पण तो सुप्रियाताई सुळे यांच्याशी बोलला असल्याचं पाटील म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

सुप्रिया सुळेंनंतर पार्थ पवार आता अभिजीत पवारांच्या भेटीला

कोरोनाबाधित रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील याची दक्षता घ्या, अजितदादांच्या कडक सूचना

राज्यात ४ लाखांहून अधिक रुग्ण बरे, आजही १० हजारांहून अधिक रूग्ण बरे…

कोरोना- पुण्यात आतापर्यंत 55 हजारांहून अधिक रूग्णांना डिस्चार्ज

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या