अमरावती | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आई वाय. एस. विजयम्मा यांनी वायएसआरसीपीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची कन्या आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची धाकटी बहीण वाय. एस. शर्मिला यांनी युवाजना श्रमिका रेथ्यु तेलंगणा पक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे वाय. एस. विजयम्मा यांनी लेकीच्या पक्षाला साथ देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी वायएसआरसीपीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि त्यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांचे वर्षभरापुर्वी मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांनी मागील वर्षी वेगळा पक्ष स्थापन केला होता. वाय. एस. शर्मिला यांच्या पक्ष स्थापनेच्यावेळी विजयम्मा यांनी त्यांना आशिर्वाद दिला होता आणि आज त्यांनी वायएसआरसीपीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आज जगनमोहन रेड्डी यांच्या वडीलांची 73 वी जयंती आहे.
यावेळी जगनमोहन रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि आईही उपस्थित होत्या. यावेळी शर्मिलाचे पती अनिल कुमार उपस्थित नव्हते. कुमार यांनी नुकतेच आंध्र प्रदेशात नवा पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले होते. त्यांनी विशाखापट्टणममध्ये मागासवर्गीय, अनुसुचित जाती, जमाती, आणि अल्पसंख्यांकाच्या मागण्यांसाठी विविध गटांच्या भेट घेऊन चर्चा केली.
वाय.एस. विजयालक्ष्मी विजयम्मा ह्यांनी सप्टेंबर 2009 मध्ये त्यांचे पती वाय. एस. आर. यांच्या रिक्त जागेवर निवडणूक लढविली होती व त्या विजयी झाल्या होत्या. 2014 साली त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला होता.
थोडक्यात बातम्या –
काँग्रेस नेत्याने अग्निपथ योजनेशी जोडला शिंजो आबेंच्या मृत्यूशी संबंध, म्हणाले…
शिंदे-फडणवीस अमित शहांच्या भेटीला, तिघांमधील बैठक रात्री 2 वाजता संपली
अमरनाथमध्ये ढगफुटी; आतापर्यंत 15 भाविकांचा मृत्यू
‘खाली काही घातलं की नाही?’; ‘त्या’ व्हिडीओमुळे मलायका अरोरा सोशल मीडियावर ट्रोल
‘मी व्हॅनिटी व्हॅनमध्येही सेक्स केलाय, रिस्क असते पण…’; रणवीरने सांगितला तो किस्सा
Comments are closed.