महाराष्ट्र वर्धा

वर्ध्यातील भाजपचे पहिले खासदार विजयराव मुडे यांचं निधन

वर्धा | भाजपचे माजी खासदार विजयराव मुडे यांना त्यांच्या आर्वी येथील निवासस्थानी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे पहिले खासदार म्हणून विजयराव मुडे विजयी झाले होते. विजयराव मुडे यांनी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात कार्य केलं.

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, लोकसभा सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली. जनसामान्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची तळमळ असायची.

विजयराव मुडे हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं 13 महिन्याचं सरकार असताना वर्ध्यात भाजपचे खासदार होते. त्यापूर्वी ते 1995 मध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार राहिले आहेत.

महत्वाच्या बातम्या

“जगात काहीही अशक्य नसतं…” धोनीच्या निवृत्तीवर सुप्रिया सुळेंची खास प्रतिक्रिया

धोनी कर्णधार होण्यामागे शरद पवारांचा होता हात, आव्हाडांनी सांगितलेलं ते टॉप सिक्रेट पुन्हा चर्चेत!

लालपरीची जिल्हाबंंदी उठणार; सरकारचा महत्वपुर्ण निर्णय येण्याची शक्यता!

“पालकमंत्री बदलणं पेट्रोल पंपावरील कामगार बदलण्यासारखं नाही”

‘आयसीसी’नं महेंद्रसिंग धोनीसाठी ट्विट केला खास व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या