Top News देश

विकास दुबे एन्काऊंटर प्रकरण; 4 पोलीस जखमी

कानपूर | उत्तर प्रदेशातील मोस्ट वाॅन्टेड आरोपी विकास दुबेचा चकमकीदरम्यान एन्काऊंटर झाला आहे. विकास दुबेला कानपूर घेऊन जात असताना पोलिस ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. अपघातात 4 पोलिस अधिकारी जखमी झाल्याची माहिती कानपूर पोलिस महानिरिक्षक मोहित अग्रवाल यांनी दिली आहे.

विकास दुबेला कानपूरला चौकशीला घेऊन जाण्यासाठी पोलिसांचा ताफा निघाला. मात्र ताफ्यातील एका गाडीचा आज पहाटेच्या दरम्यान अपघात झाला. याचवेळी त्याने पोलिसांचं पिस्टल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या पोलिस चकमकीत त्याचा एन्काऊंटर झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

गुरूवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्याला उज्जैनच्या महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली होती. मात्र त्याला उज्जैनवरुन कानपूरला घेऊन जाताना स्पेशल टास्क फोर्सच्या एका गाडीला अपघात झाला. यानंतर पुढील घटनाक्रम घडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान विकास दुबेवर उत्तर प्रदेशच्या 8 पोलिसांना मारल्याचा आरोप आहे. तसंच त्याच्यावर अन्य प्रकारचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत. राजकारणाशी विकास दुबेचा घनिष्ठ संबंध राहिलेला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

विकास दुबे हत्याकांड; काल ‘या’ व्यक्तीनं केली एन्काऊंन्टरची मागणी, आज झाली सत्य घटना…

कसा मारला गेला विकास दुबे?, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात; पळून जाणाऱ्या दुबेचा एन्काऊंटर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या