Top News देश

कसा मारला गेला विकास दुबे?, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

कानपूर |  उत्तर प्रदेशातील मोस्ट वॉन्टेड आरोपी विकास दुबेचा एन्काऊंटर झाल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटे पहाटे हा थरारक एन्काऊंटर झाल्याची माहिती आहे. दुबेला कानपूरला घेऊन जात असताना हा एन्काऊंटर झाला आहे.

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेला मुख्य आरोपी विकास दुबे याला गुरूवारी सकाळी अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. पुढील अधिक चौकशीसाठी त्याला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला.

त्यावेळी विकास दुबेने पोलिसांचं पिस्टल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला तसंच पोलिसांवर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याला मारल्याची बातमी पुढे येत आहे. त्यानंतर विकास दुबेला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी चेकअप केलं असता त्याला मृत घोषित केलं गेलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तत्पूर्वी विकास दुबेवर उत्तर प्रदेशच्या आठ पोलिसांचा खात्मा केल्याचा आरोप होता. आठवड्याभरापासून विकास पोलिसांपासून लपत होता तर पोलिसांकडून विकासचा शोध सुरू होता. काल सकाळी विकास मध्य प्रदेशमधील महाकालच्या मंदिरात दर्शनासाठी आला होता. त्यावेळी त्याने मंदिर परिसरात एकच आरडाओरड सुरू केली. मीच विकास दुबे…. कानपूरवाला…. असं म्हणत त्याने तिथे उपस्थित असणाऱ्या सुरक्षारक्षकांना पोलिसांना बोलावण्याची सूचना केली आणि थोड्या वेळात स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली. यावरून त्याला सरेंसर व्हायचं होतं, असं बोललं गेलं.

अटक केल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांना कळवलं. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांची विशेष पोलिस टीम उज्जैनला रवाना झाली आणि त्यांनी विकास दुबेला पुढील चौकशीसाठी ताब्यात घेऊन कानपूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. मात्र रस्त्यात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पोलिस ताफ्यातील गाडीला अपघात झाला आणि हाच मौका साधत विकासने यावेळी पोलिसांजवळचं पिस्टल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला तसंच पोलिसांवर देखील त्याने फायरिंग केली.

विकासच्या फायरिंगने चार पोलिस जखमी झाल्याचं देखील वृत्त आहे. त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं गेलं आहे. डॉक्टर त्यांच्यावर योग्य ते उपचार करत आहेत.

विकासने पोलिसांवर फायरिंग केलं त्यानंतर पोलिसांनी देखीस आत्मसंरक्षणासाठी विकासवर फायरिंग केलं. आणि याच चकमकीत विकास दुबेचा अंत झाला. 30 वर्षानंतर विकास दुबेची दहशत अखेर संपुष्टात आली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 1006 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात आज 6875 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

महत्त्वाच्या बातम्या-

विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात; पळून जाणाऱ्या दुबेचा एन्काऊंटर!

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

गुडन्यूज! कोरोनावरील सर्वात स्वस्त जेनेरिक औषध बनविण्यात भारताच्या ‘या’ कंपनीला मोठं यश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या