Top News देश

विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात; पळून जाणाऱ्या दुबेचा एन्काऊंटर!

कानपूर | उत्तर प्रदेशातील मोस्ट गँगस्टर आणि कानपूर एन्काऊंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी विकास दुबेचा एन्काऊंटर झालेला आहे. विकास दुबेला घेऊन जात असताना त्याच्या गाडीला अपघात झाला. याचवेळी त्याने पोलिसांचं पिस्टल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या पोलिस चकमकीत त्याचा एन्काऊंटर झाल्याची माहिती आहे. ‘आज तक’ने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

 

 

गुरूवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्याला उज्जैनच्या महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांकडे सोपवलं. अधिक चौकशीसाठी त्याला उज्जैनवरून कानपूरला घेऊन जाण्याचा प्लॅन ठरला.

त्यानुसार त्याला कानपूरला नेत असताना पहाटे पहाटे एका गाडीला अपघात झाला. अपघातानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी यावेळी त्याला सोडलं नाही.

दरम्यान विकास दुबेवर उत्तर प्रदेशच्या 8 पोलिसांना मारल्याचा आरोप आहे. तसंच त्याच्यावर अन्य प्रकारचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत. राजकारणाशी विकास दुबेचा घनिष्ठ संबंध राहिलेला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 1006 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात आज 6875 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

महत्त्वाच्या बातम्या-

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

गुडन्यूज! कोरोनावरील सर्वात स्वस्त जेनेरिक औषध बनविण्यात भारताच्या ‘या’ कंपनीला मोठं यश

ठाकरे सरकारच्या कामाचा धडाका, पनवेल-कर्जत, ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाच्या कामास गती!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या