Top News देश

विकास दुबेच्या लव्हमॅरेजची रक्तरंजीत कहाणी; सासू-सासऱ्यांचा विरोध असा काढला मोडून

कानपूर | कुख्यात गुंड विकास दुबेची कानपूरमधील ३० वर्षांची दहशत आता संपली आहे. विकास आणि त्याची पत्नी रिचा यांची लव्हस्टोरी देखील दुबेच्या दहशती एवढीच रक्तरंजित असल्याचं आता समोर आलं आहे. शहडोल जिल्ह्यातील रिचा निगमसोबत दुबेचा प्रेमविवाह २३ वर्षांपूर्वी झाला होता.

विकास कानपुरमधील शास्त्रीनगर परिसरात आपल्या आत्याच्या घरी अभ्यासासाठी येत असे. आत्याच्या शेजारच्या घरातीलच रिचा निगम नावाच्या मुलीवर विकासाचा जीव जडला. रिचाला मनविण्यासाठी त्यानं तीचा भाऊ ज्ञानेंद्र सोबत मैत्री केली. अन विकासचं त्याच्या घरी येणंजाणं सुरू झालं.

दोघांच्या गाठीभेटी वाढू लागल्या. रियादेखील दुबेच्या प्रेमात वहावत गेली. शेवटी रिचानंच आपल्या घरी दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. मात्र रिचाचे वडिल एअर फोर्समध्ये चांगल्या हुद्द्यावर कामाला होते. त्यांना आपल्या मुलीच्या आंतरजातीय विकासाला परवानगी नव्हती.

शेवटी विकासनं रिचाला १९९८ मध्ये पळवुन नेलं अन दोघांनी लग्न केलं. रियाच्या आईवडिलांचा विरोध मोडण्यासाठी विकासनं बंदूक दाखवून त्यांना धाक दाखवल्याचा दावाही आता केला जात आहे. लग्नानंतर रिया विकासच्या कामात त्याला मदत करत असे. विकासाच्या एन्काऊंटरनंतर आता त्याच्या बायकोसमवेत मुलगा, सासू व सासरे देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत.

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

…तर भाजपच्या 40-50 जागाच निवडून आल्या असत्या; शरद पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय फरक आहे?, शरद पवारांनी ठेवलं अचूक बोट!

सरकारस्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती का?, शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले…

तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांचं आश्चर्यकारक उत्तर

तेव्हा मात्र मला मोठा धक्काच बसला अन् समजलं की…..- शरद पवार

उद्धव ठाकरे देखील ‘त्याच’ वाटेने पुढे चालले आहेत- शरद पवार

साताऱ्याची ती पावसातली सभा आता परत होईल?, शरद पवारांचं खास अंदाजात उत्तर

2014 च्या भाजप-शिवसेना सरकारवर शरद पवारांचं खळबळजनक भाष्य, म्हणाले…

राम मंदिर आंदोलनाशी तुमचा संबंध आला नाही, राऊतांच्या कळीच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले…

आज माणूस माणसाला घाबरतोय असं चित्र आहे मग तुम्ही…., राऊतांच्या प्रश्नावर पवार म्हणाले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या