Top News देश

विकास दुबेच्या एन्काऊंटरनंतर या गावात जोरदार आनंदोत्सव; कारणही आहे तसंच…

कानपूर | कुख्यात गुंड विकास दुबेची कानपूरमधील ३० वर्षांची दहशत आता संपली आहे. आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेल्या दुबेचा एन्काऊंटर करण्यात आल्यावर बिकरू या छोट्याशा गावात मात्र फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष केला जात आहे.

चौबेपूर भागातील बिकरू या गावात विकासचा जन्म झाला. लहानपणी छोट्या मारामारी करणारा विकास या भागातला कुख्यात गुंड बनला. दुबेच्या या दहशतीचा त्याचं गाव बिकरू आणि परिसरातील गावांनाही बराच त्रास होत असे. यामुळे दुबेचा एन्काऊंटर झाल्यापासून या भागातील नागरिकांना आनंदाचा पारावारच उरला नाही.

 

 

या भागातील कित्येकांच्या जमीनी हडपणं, खून करणं, धमक्या देणं यामुळे दुबे व त्याच्या टोळक्याची या भागात चांगलीच दहशत होती. पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरच्या कारवाईला गावातील नागरिक म्हणूनच समर्थन देतात.

पोलिसांचं काम आहे की जनतेच्या मनातील भीती संपवून टाकणं. उत्तर प्रदेश पोलिसांनी हे काम अगदी चोखपणे पार पाडल्याचं मत दुबेच्या गावातील नागरिकांनी व्यक्त केलं आहे.

विकास दुबे संबंधीच्या बातम्या-

विकास दुबेच्या लव्हमॅरेजची रक्तरंजीत कहाणी; सासू-सासऱ्यांचा विरोध असा काढला मोडून

अंत्यविधीनंतर विकास दुबेची बायको भडकली, संतापाच्या भरात केलं ‘हे’ धक्कादायक विधान!

पोलिसांनी विकास दुबेचा एन्काऊंटर केला खरा, मात्र आता ‘या’ अजब गोष्टीची एकच चर्चा!

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

सरकारस्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती का?, शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले…

तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांचं आश्चर्यकारक उत्तर

साताऱ्याची ती पावसातली सभा आता परत होईल?, शरद पवारांचं खास अंदाजात उत्तर

…तर भाजपच्या 40-50 जागाच निवडून आल्या असत्या; शरद पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या