Top News देश

विकास दुबे हत्याकांड; काल ‘या’ व्यक्तीनं केली एन्काऊंन्टरची मागणी, आज झाली सत्य घटना…

कानपूर| आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असणारा कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. मात्र विकास आणि त्याला साथ देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचा एन्काऊंटर केले पाहिजेत, अशी मागणी शहीद झालेल्या जितेंद्र कुमार यांचे भाऊ झहेंद्र पाल यांनी केली होती.

उत्तर प्रदेशात कर्फ्यू असतानाही विकास दुबे मध्य प्रदेशात पोहचलाच कसा असा सवालही जितेंद्र यांनी उपस्थित केला आहे. एवढंच नव्हे तर दुबेवर राजकीय वरदहस्त असल्याचाही आरोप जितेंद्र यांनी लगावला आहे.

गुरूवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास त्याला उज्जैनच्या महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश पोलिसांकडे सोपवलं. अधिक चौकशीसाठी त्याला उज्जैनवरून कानपूरला घेऊन जाण्याचा प्लॅन ठरला.

त्यानुसार त्याला कानपूरला नेत असताना पहाटे पहाटे एका गाडीला अपघात झाला. अपघातानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी यावेळी त्याला सोडलं नाही. जनतेकडूनही विकासचा एन्काऊंटर  करण्यात यावा, अशी मागणी केली जात होती.

ट्रेंडिंग बातम्या-

चिंताजनक! पुण्यात एकाच दिवसात 1006 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

राज्यात आज 6875 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?

महत्त्वाच्या बातम्या-

विकास दुबेला घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात; पळून जाणाऱ्या दुबेचा एन्काऊंटर!

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्यासाठी जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

गुडन्यूज! कोरोनावरील सर्वात स्वस्त जेनेरिक औषध बनविण्यात भारताच्या ‘या’ कंपनीला मोठं यश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या