बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विकास दुबेचा एवढा होता दरारा, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची हत्या करुनही…

कानपूर | उत्तर प्रदेशातील मोस्ट गँगस्टर आणि कानपूर एन्काऊंटर प्रकरणातील प्रमुख आरोपी विकास दुबेचा एन्काऊंटर झालेला आहे. विकासची कानपूर भागात तब्बल २० वर्षांपासूनची दहशत होती. भाजपच्या माजी राज्यमंत्र्यांची पोलिस स्टेशनमध्येच गोळ्या झाडून हत्या केल्यावर दुबेच्या दहशतीला सुरूवात झाली.

विकास दुबे हा बहुजन समाज पक्षाचे माजी आमदार हरिकिशन श्रीवास्तव यांच्या गोटातील विश्वासाचा व्यक्ती होता. श्रीवास्तव यांच्या विरोधात भाजपचे संतोष शुक्ला यांनी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र श्रीवास्तव यांचा १२०० मतांनी विजय झाला. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी शहरातून मिरवणूक काढण्यात आली, अन अचानक दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

यादरम्यान दुबेनं लल्लन बाजपेयी या संतोष मिश्रा यांच्या विश्वासातल्या माणसाला जबर मारहाण केली. मारहाणीचं प्रकरणं नेहमीचं झालं. पुढे जाऊन संतोष मिश्रा राज्यमंत्री झाले. यावेळेस पुन्हा एकदा दुबेनं लल्लन बाजपेयीला मारहाण केली. लल्लनने राज्यमंत्री मिश्रा यांना फोन लावून मदतीसाठी येण्याची विनवणी केली. मिश्रा यांनी त्वरित शिवली पोलिस स्टेशनात धाव घेतली. पोलिसांना घेऊन ते लल्लनची मदत करायला जाणार इतक्यात दुबेची गॅंग पोलिस स्टेशनमध्ये आली.

यावेळेस दुबे आणि राज्यमंत्री मिश्रा यांच्यात भांडण झालं. राग अनावर होऊन दुबेनं संतोष मिश्रा यांच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिस स्टेशनमध्येच एवढ्या बड्या नेत्याची हत्या होऊनही पोलिसांची मात्र त्याला अटक करण्याची हिंमत झाली नाही.

अखेरीस, २००२ मध्ये दुबेनं स्वतःच पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. यादरम्यान मायावतींना मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला होता. दुबे पोलिस स्टेशनात आत्मसमर्पण करायला आला तेव्हा त्याच्यासोबत बसपातील अनेक नेतेमंडळी सोबत होती.

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

…तर भाजपच्या 40-50 जागाच निवडून आल्या असत्या; शरद पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय फरक आहे?, शरद पवारांनी ठेवलं अचूक बोट!

सरकारस्थापनेबाबत भाजपशी चर्चा झाली होती का?, शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले…

तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांचं आश्चर्यकारक उत्तर

तेव्हा मात्र मला मोठा धक्काच बसला अन् समजलं की…..- शरद पवार

उद्धव ठाकरे देखील ‘त्याच’ वाटेने पुढे चालले आहेत- शरद पवार

साताऱ्याची ती पावसातली सभा आता परत होईल?, शरद पवारांचं खास अंदाजात उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More