Top News

पोलिसांनी विकास दुबेचा एन्काऊंटर केला खरा, मात्र आता ‘या’ अजब गोष्टीची एकच चर्चा!

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड विकास दुबेच्या एन्काऊंटर प्रकरणाची देशभरात एकच चर्चा सुरु आहे. अपघाताचा फायदा घेत पळून जाणाऱ्या विकास दुबेचा एन्काऊंटर केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे, मात्र या एन्काऊंटरवर आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

विकास दुबेला उज्जैनच्या मंदिरातून अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेश पोलिसांकडून उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर टाटा सफारी गाडीत बसवलं होतं, मात्र अपघात झालेली गाडी महिंद्रा एक्सयूव्ही ३०० होती. याच विषयावर आता जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

काही पत्रकारांनी विकास दुबेला बसवलेल्या गाडीचा पाठलाग केला होता. टोलबूथवर विकास दुबे टाटा सफारी गाडीत असल्याचं माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झालं होतं, असं असताना विकास दुबे महिंद्रा एक्सयूव्ही ३०० गाडीत गेला कसा?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर एकिकडे या एन्काऊंटरचं समर्थन केलं जात आहे, तर दुसरीकडे हा एन्काऊंटर प्रीप्लॅन होता, असा दावा केला जात आहे. विकास दुबेला पळूनच जायचं होतं तर पोलिसांच्या स्वाधीन का झाला असता?, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पारनेरमधील ‘त्या’ नगरसेवकांची नाराजी कायम; उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी

गुलाल उधळला, फटाकेही फोडले, पण अंगावर खाकी वर्दी काही मिळालीच नाही!

शरद पवार मुलाखत स्पेशल बातम्या-

साताऱ्याची ती पावसातली सभा आता परत होईल?, शरद पवारांचं खास अंदाजात उत्तर

राम मंदिर आंदोलनाशी तुमचा संबंध आला नाही, राऊतांच्या कळीच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले…

आज माणूस माणसाला घाबरतोय असं चित्र आहे मग तुम्ही…., राऊतांच्या प्रश्नावर पवार म्हणाले

…तर भाजपच्या 40-50 जागाच निवडून आल्या असत्या; शरद पवारांनी सांगितलं ‘हे’ कारण

ठाकरे सरकार आणि राष्ट्रवादीत मतभेद आहेत काय?, शरद पवारांचं धडाकेबाज उत्तर

‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांनी दिला ‘हा’ सल्ला

तुम्ही या सरकारचे हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल?; शरद पवारांचं आश्चर्यकारक उत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या