Top News महाराष्ट्र मुंबई

दया नायकांनी पकडलेल्या विकास दुबेच्या हस्तकांना एन्काऊंटरची भीती, केली ‘ही’ मागणी

ठाणे | महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात असलेला उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबेचा उजवा हात मानला जाणारा अरविंद उर्फ गुड्डण त्रिवेदीला एन्काऊंटरची भीती वाटत आहे. त्यामुळे कानपूरला नेताना आपल्याला रस्ते मार्गाने न नेता विमानाने न्यावे, अशी विनंती त्याने केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये विकास दुबेचा एन्काऊंटर करण्यात आला, त्यानंतर त्याचे साथीदार फरार झाले होते. त्यापैकी दोन जण महाराष्ट्रातील ठाण्याजवळ लपल्याची माहिती एटीएसच्या पथकाला मिळाली होती. एटीएसचे पोलीस निरीक्षक दया नायक यांनी कोलशेत-ढोकाळी परिसरातील एका चाळीतून दोन जणांना अटक केली होती.

अरविंद तिवारीसह सोनू त्रिवेदीला पोलिसांनी रविवारी ठाण्याच्या विशेष सत्र न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दोघांची कोरोना टेस्ट करण्यात येणार असून त्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे, असं दया नायक यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कानपूरला नेताना आपल्याला रस्ते मार्गाने न नेता हवाई मार्गे न्यावं, अशी विनंती दोन्ही आरोपींच्या वतीने त्यांचे वकील अनिल जाधव यांनी न्यायालयात केली आहे. त्यांच्या विनंती अर्जावर न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

राजभवनात कोरोनाचा शिरकाव…राज्यपालांची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात…

‘लवकरात लवकर जयपूरला या…’ दिल्लीत ठाण मांडलेल्या आमदारांना मुख्यमंत्री गेहलोतांचे आदेश

धारावी कोरोनामुक्तीचं श्रेय सरकारचं नसून RSSचं, स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून काम केलं- चंद्रकांत पाटील

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, सचिन तेंडुलकरचं लगोलग ट्विट, म्हणतो…

अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण, रेखा यांचा बंगला सील!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या