देश

‘मी समाधानी, मात्र दुबेची चौकशी झाली असती तर…’; शहीद पोलिसाच्या पत्नीची प्रतिक्रिया

लखनऊ | आठ पोलिसांच्या हत्येचा आरोप असलेल्या विकास दुबेचा उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. मात्र कानपूरमध्ये शहीद झालेल्या पोलिसाच्या पत्नीने दुबेकडून आणखीन माहिती मिळाली असती असं मत व्यक्त केलं आहे.

3 जुलै रोजी झालेल्या एन्काऊंटरमध्ये शहीद झालेले पोलीस कर्मचारी सुल्तान सिंह यांच्या पत्नी उर्मिला वर्मा यांनी विकास दुबेच्या एन्काऊंटनंतर आपल्या भावना व्यक्त केल्यात. मी समाधानी आहे. मात्र आता विकास दुबेला पाठींबा देणारे कोण आहेत हे कसं समोर येणार? त्याची चौकशी झाली असती तर ही माहिती मिळाली असती, असं उर्मिला यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांच्या हत्येला जबाबदार असलेला मुख्य आरोपी विकास दुबे याला सकाळी अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेशातील उज्जैन येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. पुढील अधिक चौकशीसाठी त्याला कानपूरला घेऊन जात असताना पोलिसांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला.

विकास दुबेने यावेळी पोलिसांची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याला मारल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

विकास दुबेचा एन्काऊंटर झाला, पण ‘या’ 11 प्रश्नांची उत्तर कोण देणार आणि ती कधी मिळणार???

“कारने नाही पलटी खाल्ली…; सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यात आलंय”

महत्वाच्या बातम्या

उत्तर प्रदेश पोलिसांचा मला अभिमान…, एन्काऊंटरनंतर शहीद पोलिस जवानाच्या वडिलांची प्रतिक्रिया

व्यायामाचा कंटाळा असेल तर रोज काही अंतर चाला; होतील ‘हे’ 7 महत्त्वाचे फायदे

‘शरद पवार तेव्हा संसदेत मोदींच्या चेम्बरमध्ये का गेले होते?’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या