महाराष्ट्र मुंबई

“मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा हे भाजपचे षडयंत्र”

मुंबई | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विकास लवांडे यांनी प्रतिक्रिया देत मेहबूब इब्राहिम शेख याचं समर्थन केलं आहे.

युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना मी जवळून ओळखतो. सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता राजकारणात पुढे जातोय याची कुणाला तरी अडचण असणार म्हणून खोट्या गुन्ह्यात अडकवून बदनामीचा करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. तसेच फिर्यादीने कुणाकडून सुपारी घेतली याचा शोध लागायला हवा, असं विकास लवांडे यांनी म्हटलं आहे.

मेहबूब शेख यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत तरूणीने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. शिरूर तालुक्यात दुसरा कोणीही मेहबूब इब्राहिम शेख नावाचा व्यक्ती नाही. कोणी असेल तर पोलिसांना शोधावं. पण संबंधित महिलेला मी कधीही भेटलो नाही, दहा अकरा तारखेला मी मुंबईत होतो. तर 17 तारखेला मी माझ्या मूळ गावी असल्याचं मेहबूब शेख यांनी सांगितलं आहे.

महिलांच्याप्रती मला प्रचंड आदर आहे. तसेच माझा याप्रकरणाशी कुठलाही संबंध असला तर मी फासावर जायला तयार आहे. मी राजकीय आणि सामाजिक जीवनातून संन्यास घ्यायला तयार आहे, असं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

“मग हा शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?

ब्रिटनमधील ‘स्ट्रेन’चा एकही रुग्ण राज्यात नाही- राजेश टोपे

“डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य”

राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही?- चित्रा वाघ

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, इतके नगरसेवक हाती शिवबंधन बांधणार

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या