बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नातीमुळं झाली विखे-मोदी भेट, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली | आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. मात्र ही भेट झाली ती म्हणजे राधाकृष्ण यांची नात अनिषा सुजय विखे-पाटीलमुळे. कारण अनिषाने तिचे वडील खासदार सुजय विखे-पाटील यांच्याकडे हट्ट धरला होता की तिला नरेंद्र मोदींना भेटायचं आहे.

दोन दिवस अनिषाने सुजय यांच्याकडे मोदींना भेटण्याचा हट्ट धरला. मात्र सुजय विखे-पाटील तिला, मोदी पंतप्रधान असल्यामुळे ते कामात असतात, असं सांगितलं. मात्र अनिषाने तिच्या बाबांच्या मेलवरून थेट मोदींना मेल केला. मी अनिषा आहे आणि मला तुम्हाला भेटायचंय, असा मेल अनिषा मेलमध्ये म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे थोड्याच वेळात मेलवर रिप्लाय आला. त्यात भेटण्याची वेळ दिली होती.

सुजय विखे-पाटील कुटंब नरेंद्र मोदींना भेटले. या भेटीदरम्यान मोदींनी अनिषासोबत दिलखुलासपणे गप्पा मारल्या. मोदींनी अनिषाला चॉकलेट्स दिले त्यानंतर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. अनिषाने मोदींना, तुम्ही इथे बसता का?, हे तुमचं ॲाफीस आहे?, असा प्रश्न केला. यावर मोदी म्हणाले की, हे माझं कायमचं ॲाफीस नाही. तू आली म्हणून तुझ्या भेटीला आलो. मी तर तुझ्याशी गप्पा मारायला आलो आहे.

मोदी हे उत्तर देत नाहीत तोपर्यंत अनिषाने दुसरा प्रश्न केला की, तुम्ही गुजरातचे आहात का? मग तुम्ही राष्ट्रपती कधी होणार? यावर मोदी यावर हसले. त्यानंतर सुजय विखेंनी अनिषाला थांबवलं. मोदींनी 5-7 मिनिट अनिषाशी मन मोकळेपणानं गप्पा मारल्या. या भेटीवेळी सुजय विखेंच्या पत्नी धनश्री विखे-पाटील उपस्थित होत्या.

थोडक्यात बातम्या-

राज कुंद्रासोबतचा ‘हा’ फोटो शेअर करत शर्लिन चोप्राने केला मोठा खुलासा; म्हणाली…

…म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार!

मराठा आरक्षणाबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय!

‘…त्या दिवशी पुन्हा कडक लॉकडाऊन करणार’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

राज्यातील हॉटेल चालकांसाठी मोठी बातमी! रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी, पाळावे लागणार ‘हे’ नियम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More