राष्ट्रवादी तुम्हाला काँग्रेसवर भरोसा नाय काय? -विखे पाटील

मुंबई | पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आयोजित केलेल्या बैठकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठ फिरवली. यावरुन, तुमचा आमच्यावर भरोस नाय काय?, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला आहे. 

राधाकृष्ण  विखे पाटलांच्या घरी विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. 

दरम्यान, शेतकरी कर्जमाफीवरुन विखे पाटलांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच बँकांसमोर ढोल वाजवणाऱ्या शिवसेनेवर “त्यांच्या मेंदूत केवळ झोल-झोल, त्यांची भूमिका गोल-गोल”, अशा शब्दात त्यांनी शरसंधान साधलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या