Ladki Bahin Yojana | अनेक लाडक्या बहिणींच्या (Ladki Bahin Yojana) खात्यावर अजूनही सातवा हप्ता (7th Installment) जमा झालेला नाही. सहावा आणि सातवा हप्ता उशिरा जाहीर केल्याने, तसेच तक्रारी आलेल्या भागांमध्ये फेरतपासणीचे आदेश दिल्याने, हप्ता मिळण्यास विलंब होत आहे. त्यातच आता धक्कादायक बाब म्हणजे, तब्बल साडेचार लाख महिलांनी या योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज मागे घेतले आहेत.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. महायुती सरकार (Mahayuti Government) मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात (Budget) या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यात वाढ करून तो २१०० रुपये करणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे.
विखे पाटलांचे (Vikhe Patil) आश्वासन
अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) म्हणून पुन्हा वर्णी लागल्याने शिर्डी (Shirdi) परिसरातील नागरिकांनी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची भव्य मिरवणूक काढत नागरी सत्कार केला.
या सत्कार सोहळ्यात बोलताना विखे पाटील यांनी, “महायुती सरकार लाडक्या बहिणींना वाऱ्यावर सोडणार नाही,” असा विश्वास व्यक्त केला.
तसेच, मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) हप्ता १५०० वरून २१०० रुपये करण्याचा प्रस्ताव मांडून तो मंजूर केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
४.५ लाख महिलांची माघार
लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) सातवा हप्ता (7th Installment) रखडल्याने आणि योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणींमुळे राज्यातील तब्बल साडेचार लाख महिलांनी या योजनेतून माघार घेतली आहे. योजनेचा लाभ नको म्हणून त्यांनी अर्ज मागे घेतले आहेत.
Title : Vikhe Patil Promise to Increased Installment of Ladki Bahin Yojana