मुंबई | अहमदनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला म्हणजे विखेंना सोडली नाही. त्यााचा बदला म्हणून राधाकृष्ण विखेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपात आणण्यासाठी मध्यस्थाची भूमिका निभावली असल्याच्या चर्चा आहेत.
भाजपात प्रवेश करतावेळी आघाडीतले अनेक नेते पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचं विखे म्हणाले होते. त्यांचं हेच वक्तव्य आता खरं होताना दिसून येत आहे.
आमदार वैभव पिचड, साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, मुंबईच्या वडाळ्याचे काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर आणि नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक या नेत्यांच्या भाजप प्रवेशात विखेंनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचं बोललं जातंय.
दरम्यान, राधाकृष्ण विखेंनी भाजपची वाट दाखवली, असं म्हणत पिचड यांनी विखेंचे आभार मानले.
महत्वाच्या बातम्या-
-तानाजी सावंतांनंतर आता आदित्य ठाकरे म्हणतात… होय खेकडे धरण फोडू शकतात!
-राष्ट्रवादीने अमोल कोल्हे आणि उदयनराजेंच्या खांद्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी
-सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्रचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना!
-राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी का दिली??? चित्रा वाघ म्हणतात…
-तिहेरी तलाक विधेयकावर असदुद्दीन ओवैसींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणतात…
Comments are closed.