Top News

‘माझ्यामुळे सर्वांना त्रास झाला, मला गोळ्या झाडा’, हिंगणघाट प्रकरणातील आरोपीची मागणी

वर्धा | हिंगणघाट येथील जळीतकांडातील पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी विक्की नगराळे याला फासावर लटकवण्याची मागणी नागरिक करत आहेत. मात्र आरोपीने स्वत:च मला गोळ्या घाला अशी मागणी केली आहे.

आरोपीला पीडितेच्या मृत्यूची माहिती नव्हती. तिच्या मृत्यूबद्दल कळताच त्याने माझ्यामुळे सर्वांना त्रास होत असल्याचं म्हणत गोळ्या मारण्याची मागणी केल्याचं कळतंय.

लोकभावनेच्या दबावातून त्याने ही मागणी केल्याचं सांगितलं जात आहे. आरोपी विकी नगराळेला सध्या वर्ध्या शहरातील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, विकी नगराळेला 4 दिवस पोलिस कोठडीत तर 4 दिवस वर्धा कारागृहात होता. त्यानंतर 20 फ्रेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

ट्रेंडिंग बातम्या- 

झेंड्यात राजमुद्रा वापरणं राज ठाकरेंना महागात; राज्य निवडणूक आयोगाची मनसेला नोटीस!

“आता… शिवसेनेला महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्रपक्ष काँग्रेस?”

महत्वाच्या बातम्या- 

“सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा मग 7 दिवसांचा पगार का??”

शिवजयंतीपासून महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; राज्य सरकारचा निर्णय

रोहित पवारांची आमदारकी रद्द होणार??; रोहित पवार म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या