बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणातील ‘या’ आरोपीला जामीन मंजूर

मुंबई | सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. परंतू 7 वर्षानंतर देखील नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना तसेच सीबीआयला यश आलं नाही. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना रेकी करण्यासाठी मदत करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. सीबीआयने विक्रम भावे याच्यावर मारेकऱ्यांना रेकी करण्यासाठी मदत केल्याचा आरोप ठेवला होता. 25 मे 2019 रोजी त्यानंतर पोलिसांनी विक्रम भावे याला अटक केली होती. आता या हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

अटक केल्यानंंतर देखील पोलिसांना या प्रकरणात काही ठोस पुरावे सापडले नाही, त्यामुुळे मुंबई उच्च न्यायालयाने विक्रम भावे याचा जामीन मंजूर केला आहे. पुढील दोन-तीन महिन्यांसाठी त्याला आठवड्यातून दोनदा आणि त्यानंतर आठवड्यातून एकदा अशाप्रकारे पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे.

दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाने महाराष्ट्राला हदरवलं होतं. नालासोपारा स्फोटकप्रकरणी तपास करीत असताना एटीएसला डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणाचे धागेदोरे सापडले होते. त्यानंतर विक्रम भावे याला अटक करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

“कोरोना परिस्थिती हाताळण्यात भारतातील राजकीय नेतृत्व अपयशी ठरलं”

…अन् 25 वर्षीय महिलेनं एकाच वेळी दिला चक्क नऊ बाळांना जन्म

डाॅक्टरांना राक्षस संबोधन आलं अंगलट; कॉमेडियन सुनिल पालविरोधात गुन्हा दाखल

लाॅकडाऊनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पुणे शहर रक्ताच्या थारोळ्यात

…म्हणून अशोक चव्हाणांनी मानले खासदार संभाजीराजेंचे आभार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More