बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर…”

मुंबई | राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून अनेक मुद्यांवरून रण पेटलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी राजकारणावर आणि राजकीय घटनांवर भाष्य केलं आहे.  सर्वच जण पक्षाचं काम करतात पण मोदींचं काम चांगलं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तसेच सत्तर वर्षात जे झालं नाही ते मोदींनी करून दाखवलं, असंही त्यांनी बोलून दाखवलं.

‘शिवसेना आणि भाजप हे विभक्त झाले आहेत. परंतु त्यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत फडणवीसांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी चुक झाली हे बोलून दाखवलं’, असं विक्रम गोखले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं. तसेच यावेळी त्यांनी ‘मुख्यमंत्रीपद अ़डीच-अ़डीच वर्ष वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं’, असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे.

कुणबी, क्षत्रिय सर्वच माझे आहेत. असं म्हणत त्यांनी दलितांना दलित म्हणणे पटत नसल्याचं बोलून दाखवलं. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं मोठं व्यक्तिमत्व होतं, बाबासाहेब आंबेडकर या देशाला कळलेच नाहीत, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवत बाबासाहेबांची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही, असं मत व्यक्त केलं.

पुढे बोलताना भारताचा इतिहास हा बाबरापासून छापला जातो हे दुर्दैवी असून त्यापुर्वी कुणी नव्हतं का?, असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही आणि यापुढेही नसेन, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या

नक्षलवाद्यांविरूद्ध कोम्बिंग ऑपरेशन! चकमकीत मिलींद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती

“तुला लईचं कळतं रं, आमच्या बारामतीत मी बोलायला लागलो की…”

कंगना राणावतच्या अडचणीत वाढ; काँग्रेसने केली पोलिसांकडे तक्रार

“मी पण एसटी कामगाराचा मुलगा असल्याने मला…”

“शरद पवार आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे नसून ते एकच आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More