बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“विक्रमजी, आपल्या वयाचा आदर आहे, मात्र…”

मुंबई | अभिनेत्री कंगणा रनौत हिने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे एकच वादंग पेटला आहे. कंगणाचे पुरस्कार माघारी घेऊन तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत असतानाच ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही या वादात उडी घेतली आहे. विक्रम गोखले यांनी कंगणाच्या वक्तव्याला समर्थन दिलं होतं.

“कंगणा जे म्हणतेय ते खरं आहे.” असं मत व्यक्त करत विक्रम गोखले यांनी कंगणाला समर्थन दिलं आहे. आता विक्रम गोखलेंच्या या वक्तव्यावर मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करून सुनावलं आहे.  त्या म्हणाल्या, “विक्रम जी आपल्या वयाचा आदर आहे. मात्र, स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही.” असं त्यांनी खडसावलं आहे.

त्या पुढे ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत. “आपली भक्ती एखाद्या नेत्यावर-पक्षावर असू शकते, पण हा देश स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान त्याहीपेक्षा कैकपटीनं मोठं आहे.” असं सांगून यशोमती ठाकूर यांनी पुढे म्हटलं आहे. आपल्या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असा घणाघातही त्यांनी ट्विटमधून केला आहे.

विक्रम गोखले यांनी कंगणाचं समर्थन करताना कंगणा जे म्हणाली ते खरं आहे. मी कंगणाच्या वक्तव्याचं समर्थन करतो. कोणाच्याही मदतीने स्वातंत्र्य मिळालं नाही. आपले स्वातंत्र्यवीर फासावर जात असताना त्यांना वाचवण्याचं धाडस कोणी केलं नाही. सर्वजण बघत राहीले. असंही विक्रम गोखले म्हणाले होते. त्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्या वक्तव्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“हे दु:ख शब्दांच्या पलीकडचे आहे”; बाबासाहेबांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी भावूक

मोठी बातमी! राजीव सातव यांच्या पत्नीला काँग्रेसकडून पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर

बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन मात्र ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण

“असा शिवआराधक शोधुन सापडणार नाही!” बाबासाहेबांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांचा तीव्र शोक

देशातील कोरोना रूग्णसंख्येतील चढउतार सुरूच, पाहा गेल्या 24 तासातील आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More