आणखी एक बँक घोटाळा; पेन बनवणारा 5 हजार कोटी घेऊन पळाला

नवी दिल्ली | नीरव मोदीचा पीएनबी घोटाळा समोर आल्यानंतर आता आणखी एक बँक घोटाळा समोर आलाय. पेन बनवणारी कंपनी रोटोमॅकचा मालक विक्रम कोठारीवर 5 हजार कोटीचं कर्ज घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे. 

कानपूरच्या विक्रम कोठारीने 5 बँकांकडून हे कर्ज घेतलं होतं. ज्यामध्ये अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओवरसीज बँक और यूनियन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. 

कानपूरच्या रोटोमॅक कंपनीच्या ऑफीसला गेल्या कित्येक दिवसांपासून टाळं लागलेलं आहे. विक्रम कोठारीचाही गेल्या काही दिवसांपासून काहीच पत्ता नाहीये. त्यामुळे आणखी एका उद्योगपतीने बँकांना लुबाडल्याचं स्पष्ट झालंय.