मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयावेळी गडकरींसह अनेक नेत्यांना डांबलं होतं!

नागपूर | नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितिन गडकरींसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांना खोलीत डांबून ठेवलं होतं, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी केलाय.

काँग्रेसकडून नागपूरमध्ये नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त आक्रोश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी मुत्तेमवार यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं

मोदी गडकरींना ग्लासातून पाणी आणून द्यायचे, मग त्याच मोदींना गडकरी घाबरू लागले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयावेळी एका शब्दानेही का बोलले नाहीत?, असंही ते म्हणाले