दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या शरीराचे 9 जणांनी लचके तोडले

मुंबई | दहावीत शिकणाऱ्या 15 वर्षीय मुलीवर 9 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना विलेपार्लेमध्ये समोर आली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल केलेत. यापैकी 6 आरोपींना अटक करण्यात आली असून तिघे फरार आहेत.

पीडित मुलगी एका आरोपीच्या घरी अभ्यासासाठी जात होती. त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि त्याची व्हिडिओ क्लिप बनवली. ही व्हिडिओ क्लिप त्याने आपल्या मित्रांना पाठवली.

धक्कादायक बाब म्हणजे या मुलांनीही पीडितेला व्हिडिओ क्लिप दाखवून व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान, सातत्याने होणारे अत्याचार सहन न झाल्याने पीडितेने आईला हा प्रकार सांगितला, त्यानंतर ही घटना उजेडात आली.