“शिवस्मारकाची उंची प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा जास्त असावी”

“शिवस्मारकाची उंची प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याच्या उंचीपेक्षा जास्त असावी”

जालना | प्रभू श्रीरामाच्या पुतळ्याची उंची 221 मीटर असेल तर शिवस्मारकाची उंची वाढवण्याबाबत विचार केला जाईल, असं वक्तव्य शिवस्मारक समितीेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केलं आहे. जालन्यात शिवसंग्राम मेळाव्यात ते बोलत होते.

शिवाजी महाराजांचा पुतळा जगात सर्वात उंच असावा अशी शिवप्रमेंची भावना आहे, त्यामुळे शिवस्मारकाच्या उंचीवर पुनर्विचार केला जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

शिवस्मारकाची उंची 210 मीटर असणार आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वात उंच असावा अशी मागणी आम्ही सरकारकडे करणार आहोत, असं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अादित्यनाथ यांनी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचा 221 मीटर उंच पुतळा उभारणार असल्याचं घोषीत केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी-शहांचं टेंशन वाढलं; केंद्रीय मंत्री उद्या ‘एनडीए’तून बाहेर पडणार???

-फोर्ब्ज इंडियाची यादी जाहीर; पहा कोण आहे सर्वात श्रीमंत भारतीय…

-नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत; पाहा कुणी केली भविष्यवाणी…

-राजस्थानच्या निकालाबद्दल रामदास आठवलेंचं भाकीत, पाहा काय म्हणाले…

-पालकमंत्री दाखवा अन् हजार रुपये मिळवा; बुलडाण्यातील अजब प्रकार

Google+ Linkedin